न्हावी शाळा सर्वांगीण विकासाचे केंद्र

न्हावी शाळा सर्वांगीण विकासाचे केंद्र
Published on

उपक्रमशील शाळा


नसरापूर, ता. १७ ः न्हावी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण क्षेत्रात नावीन्य, गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजाभिमुख उपक्रमांमुळे ही शाळा परिसरातील उपक्रमशील शाळा म्हणून विशेष ओळख निर्माण करत आहे.
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गाव परिसर स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता, पाणी वाचवा अभियान, पाणी पुनःर्वापर, जलसाक्षरता कार्यक्रम,
पर्यावरणाअंतर्गत फळ झाडांचे गावं संकल्पनेतून वृक्षलागवड, प्लास्टिक मुक्त गाव आदी उपक्रम राबविण्यात येतात.

अत्याधुनिक सुविधा
-स्मार्ट टीव्ही, संपर्क किट, ई लर्निंग अभ्यासक्रम, प्रकल्प आधारित शिक्षण, पीपीटी सादरीकरण, दिक्षा ॲप, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल बोर्ड, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, डिजिटल हजेरी व्यवस्था, स्वच्छतागृह.

उपक्रम
प्रोजेक्ट वर्क, चार्ट सादरीकरण, सर्वेक्षण, विज्ञान, गणित व पर्यावरण विषयांसाठी- फळझाडांचे गाव उपक्रम, प्रत्यक्ष प्रयोग, सर्वेक्षण, क्षेत्रभेट
वाचन उपक्रम, डिजिटलच्या मदतीने सोपे शिक्षण बालसाहित्य, गटकार्य, कथाकथन, भूमिकानाट्य, दुर्बल गटातील मुलांसाठी मार्गदर्शन, वर्गमंत्री, स्वच्छता समिती, वाचन समिती तक्रार निवारण पेटी, स्नेहसंमेलन, चित्रकला दिवस, वाचन प्रबोधन सप्ताह, आठवडे बाजार, विज्ञान दिवस, गणित आठवडा, भोंडला, पर्यावरण पूरक होळी, फटाके नको पुस्तक हवे, योग, आरोग्य जनजागृती


सामाजिक बांधीलकी
-स्थलांतरित ऊसतोड कामगार मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार, दिवाळी फराळ, थंडीचे कपडे वाटप
-वंचित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


कामगिरी
जिल्हास्तरीय अक्षरगंगा/मंथन परीक्षेत प्रथम क्रमांक व क्रीडा व सांस्कृतिकमध्ये उल्लेखनीय यश बालसाहित्य, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

पुरस्कार
उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका व राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार मिळाला आहे तसेच शाळेतील शिक्षकांचा विविध राष्ट्रीय/राज्य /जिल्हा/तालुका/ग्राम स्तरावरील पुरस्कारांनी गौरव केला आहे.

लोकसहभाग
-स्थानिक मंडळांकडून क्रीडा साहित्य मदत
-सामाजिक संस्थांचे प्रशिक्षण व प्रकल्प मार्गदर्शन माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
-विविध संस्थांकडून सीएसआर निधीतून शाळेचा विकास


भविष्यातील योजना
अधिक प्रभावी डिजिटल लर्निंग सेंटर स्थापन करणे. विषयानुसार गणित, विज्ञान, भाषा प्रयोगशाळा अधिक विकसित करणे. विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास केंद्र हरित शाळा प्रकल्प विद्युत बचत, सौरऊर्जा वापर, कचरा व्यवस्थापन सुधारणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी उपक्रम राबवण्याचा मानस आहे.

-B06124

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com