चौकशी करूनच घर खरेदी करा - गौतम चटर्जी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

‘नागरिकांनी घर खरेदी करण्यापूर्वी महारेराच्या संकेतस्थळाला भेट देऊन गृहप्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घ्यावी. त्यानंतरच घर खरेदी करावे. रेरा कायद्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी,’’ असे आवाहन महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी येथील वकिलांना केले.

पुणे - ‘नागरिकांनी घर खरेदी करण्यापूर्वी महारेराच्या संकेतस्थळाला भेट देऊन गृहप्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घ्यावी. त्यानंतरच घर खरेदी करावे. रेरा कायद्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी,’’ असे आवाहन महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी येथील वकिलांना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनावणीसाठी चटर्जी पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी येथील वकिलांशी संवाद साधला. रेरा प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. ॲड. सुरभी मेहता यांनी रेरा प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या कार्याबाबत माहिती दिली. ॲड. अमित पाटील, ॲड. चिंतामणी माने देशमुख, ॲड. ज्योती असणेकर, ॲड. स्मिता तन्ना, ॲड. मकरंद पराडकर, ॲड. वर्षा जोशी, ॲड. सुजाता भावे, ॲड. प्रवीण टिळेकर, ॲड. शिल्पा प्रताप, ॲड. निषाद कुलकर्णी, ॲड. विक्रम पाटील, ॲड. रणजित पाटील, ॲड. विवेक घोलप, ॲड. भूषण पवार, ॲड. संतोष रणदिवे, ॲड. संतोष फळफळे, ॲड. हर्शल जाधव, ॲड. हृषीकेश इंडिस या वेळी उपस्थित होते.

पुणे : लोकसभा निवडणूकीत केले काम; अजूनही मिळाला नाही दाम

रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक बांधकाम प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुणे आणि मुंबई शहरातून जास्त नोंदणी झाल्या आहेत. प्रकल्पांची नोंदणी केल्यानंतर कायद्याअंतर्गत प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पांची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. त्याच वेळी नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पाबाबत वास्तुविशारद यांचे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले, सनदी लेखापाल, अभियंता यांचे आवश्‍यक असणारे दाखले, नोंदणीकृत प्रकल्पांची मुदत वाढवून घेणे अशा अनेक बाबींची माहिती संकेतस्थळावर द्यायची असते. ही माहिती ज्या बांधकाम व्यावसायिकांनी संकेतस्थळावर दिली नाही, त्यांच्या सुनावणीसाठी ते पुण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry and buy a home gautam chatterjee