स्वच्छ भारत पथकाकडून शहरातील स्वच्छतागृहांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात असलेल्या स्वच्छतागृहांची तपासणी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत पथकाकडून आजपासून केली जात आहे. महापालिकेने शहरातील स्वच्छतागृह चकाचक केली असून पात्र ठरतील अशीच स्वच्छतागृह या पथकाला दाखवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात असलेल्या स्वच्छतागृहांची तपासणी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत पथकाकडून आजपासून केली जात आहे. महापालिकेने शहरातील स्वच्छतागृह चकाचक केली असून पात्र ठरतील अशीच स्वच्छतागृह या पथकाला दाखवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वच्छ शहरांची रँकींग ठरविण्यासाठी विविध शहरांमधील स्वच्छतेची तपासणी केंद्र शासनाच्या पथकामार्फत केली जाते. त्याच अनुशंगाने स्वच्छ भारतचे पथक शहरात येणार असल्याची माहिती महापालिकेला अगोदरच होती. त्यामुळे एरवी अस्वच्छ असणाऱ्या स्वच्छतागृहांची साफसफाई मंगळवारीच करण्यात आली. त्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी कामाला लागले. बुधवारी केंद्राचे पथक शहरात आल्यानंतर दुपारनंतर स्वच्छतागृह तपासणीला सुरूवात करण्यात आली.

वर्दळीची ठिकाणे, झोपडपट्टी, व्यावसायिक ठिकाणे आदी भागातील स्वच्छतागृहे तपासली जात आहेत. स्वच्छतागृहात पाणी, प्रकाश, हवा बाहेर जाण्यासाठी पंखे, वॉश बेसीन आदी गोष्टी पाहिल्या जात आहेत. मात्र, महापालिकेने या बाबींची अगोदरच व्यवस्था केलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of sanitary houses in the city by Swash Bharat squad