
50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी वस्तु व सेवा कर विभागाच्या अधिक्षकासह निरीक्षकाला सीआयडीने अटक केली.
'जीएसटी' अधिक्षकासह निरीक्षकास 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक
पुणे - वस्तु व सेवा कर विभागाकडे (जीएसटी) (GST) दाखल असलेले सेवा कर दायित्वाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारल्याप्रकरणी जयसिंगपुर येथील केंद्रीय वस्तु व सेवा कर विभागाच्या अधिक्षकासह निरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक (Arrested) केली. हि कारवाई (Crime) गुरुवारी जयसिंगपुर येथे करण्यात आली.
केंद्रीय "जीएसटी' विभागाचे कोल्हापुरमधील जयसिंगपुर येथे कार्यालय आहे. या कार्यालयाकडे तक्रारदाराने व त्यांच्या कर सल्लागाराने 2017-18 आणि 2020-21 या वर्षासाठीचे सेवा कर दायित्वाचे प्रकरण सादर केले होते. दरम्यान, संबंधित अधिक्षकाने हे प्रकरण निकारी काढण्यासाठी त्यांच्याकडे 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर "जीएसटी' अधिक्षक व त्यांच्या एका निरीक्षकाने 50 हजार रुपयांमध्ये संबंधित प्रकरण निकाली काढण्याबाबत तडजोड केली.
दरम्यान, तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत थेट 'सीबीआय'कडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन 'सीबीआय'ने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचला. त्यावेळी अधिक्षकासाठी निरीक्षकाने तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर "सीबीआय'ने त्याच्यासह अधिक्षकालाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना जयसिंगपुर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, 'सीबीआय'ने दोघांच्याही जयसिंगपुर व कोल्हापुर येथील घरांची झडती घेतली. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आढळली असून त्यांनी ती जप्त केली आहे.