चैतन्य विद्यालयात विज्ञान व्याख्यान

चैतन्य विद्यालयात विज्ञान व्याख्यान

Published on

ओतूर, ता. २७ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयात माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर (MSSIC) नारायणगाव यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शास्त्रज्ञ प्रा. डॉ. प्रतीक मुणगेकर यांचे विज्ञान व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी १, ४५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘मला जागतिक ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारखे गुरू मिळाले. त्यामुळे मला माझे संशोधन कार्य पूर्ण करता आले. आपल्याला आपलं ध्येय साध्य करताना परिस्थिती कधीही अडसर ठरत नाही. त्यासाठी मेहनत, जिद्द, सचोटी आणि स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आहेत. फक्त घोकंपट्टी न करता स्मार्ट वर्क करा. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते उपयोगात आणता आलं पाहिजे. कामात आपल्या अचूकता व सातत्य असायला हवे. स्वतःचे सर्व छंद जोपासून दररोज एक तास अभ्यास करता आला पाहिजे.’’
याप्रसंगी ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर नारायणगावचे उपाध्यक्ष डॉ. तानाजी वामन, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, कल्पेश जाधव, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, शांताराम पानसरे, राजश्री भालेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विशाल चौधरी व सूत्रसंचालन मिलिंद खेत्री यांनी केले. तर आभार प्रदीप गाढवे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com