सामाजिक कार्याचा वसा

साै. सुजाता जयंसिंग भुजबळ
गुरुवार, 14 मार्च 2019

प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे घेऊन जात.

प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे घेऊन जात.

सौ. गौरीताई अतुल बेनके या पुण्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक व उद्योजक दामोदर कुंबरे यांच्या कन्या. पुणे शहरातील कोथरूड परिसरात सामाजिक कार्यात व उद्योग व्यवसायात दामोदर कुंबरे व त्यांचे कुटुंबीय अग्रेसर आहे. गौरीताई यांचे माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात पुणे येथील गरवारे हायस्कूलमध्ये झाले. घरातच सामाजिक कार्याचा वारसा असल्याने गौरीताई शालेय जीवनात विविध शैक्षणिक उपक्रमांत नेहमी सक्रिय असत.

अभियांत्रिकीची आवड असल्याने त्यांनी कर्वेनगर येथील कमिन्स गर्ल्स इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी फायनान्स या विषयात एमबीए ही व्यवस्थापनशास्त्रातील पदवी संपादन केली. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली असतानादेखील स्वावलंबनाचे धडे मिळण्यासाठी त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

बंगळूर येथील आयडीएफसी या नामांकित आयटी कंपनीत कामाचा प्रदीर्घ अनुभवदेखील घेतला. मुळातच सामाजिक कार्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे चिरंजीव व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या जुन्नरवासीय झाल्या. शहरी भागातील असूनही त्या ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा यांच्याशी एकरूप झाल्या आहेत.

प्रापंचिक जबाबदारी सांभाळून गौरीताई या सासरे माजी आमदार बेनके साहेब, वडील दामोदर कुंबरे यांच्या सामाजिक कार्याचा वसा व वारसा दहा वर्षापासून सक्षमपणे सांभाळत आहेत. 

महिला, तरुणी यांचे सामाजिक, शैक्षणिक प्रश्‍न सोडवण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी गौरीताई पती अतुल यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्‍यात सक्रिय आहेत. ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळत आहेत. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या विद्यार्थांना नेहमी प्रोत्साहन देतात. या मुळेच ब्लुमिंगडेलमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले आहेत. पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून शालेय गुणवत्तेचा आलेख उंचवण्यासाठी गौरीताई नेहमी प्रयत्नशील असतात. ग्रामीण महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी अंजनी महिला उद्योगाची स्थापना केली आहे. या माध्यमातून कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

तालुक्‍यातील अनेक कुटुंबे शिक्षण व नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहर व परिसरात स्थायिक झाली आहेत. या कुटुंबाचे नोकरी व व्यवसाय आदी प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही जुन्नरकर, जुन्नर तालुका रहिवासी संघाच्या माध्यमातून त्या प्रयत्नशील आहेत. संघाच्या माध्यमातून तालुक्‍याच्या आदिवासी व दुष्काळी भागातील गरजू व वंचित घटकांना कौटुंबिक वस्तूंचे वाटप करतात. अतुल बेनके युवा मंचाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे संयोजन करत असताना तालुक्‍यातील सुशिक्षित सुमारे तेराशे युवक, युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे. 

स्वकर्तृत्वान महिलांचा सन्मान
अतुल सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून शालेय विद्यार्थांच्या कला, गुणांना वाव देण्याचे काम त्या करतात. नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान नवदुर्गांचा या अंतर्गत स्वकर्तृत्वान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे व स्वत्वाची जाणीव करून देण्याचे काम त्या करत आहेत. सहकार्यातून समृद्धी व समृद्धीतून परोपकार साधण्याचा प्रयत्न गौरीताई निःस्पृह भावनेने करतात. सामाजिक कामात पती अतुल हे गौरीताईंना नेहमी प्रोत्साहन देतात. अनिक्षा व दिविषा या कन्या व कुटुंबाची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून गौरीताई स्नेही, मित्रमंडळी, कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी यांच्याशी ऋणानुबंध जपण्याचे काम करतात. तत्काळ निर्णयक्षमता, स्पष्टवक्तेपणा, मनमोकळा स्वभाव या गुणांमुळे गौरीताईंनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Gauritai Benake on the occasion of womens day