UPSC Result 2024 : डॉक्टर ते प्रशासकीय अधिकारी डॉ. नेहा राजपूत यांचा प्रवास

Success Story : कोरोनाकाळात प्रशिक्षित डॉक्टर म्हणून सेवा बजावताना डॉ. नेहा राजपूत या प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे काम प्रत्यक्ष पाहून भारावून गेल्या.
inspiring story of dr neha rajput journey doctor to govt official
inspiring story of dr neha rajput journey doctor to govt officialSakal
Updated on

पुणे : कोरोनाकाळात प्रशिक्षित डॉक्टर म्हणून सेवा बजावताना डॉ. नेहा राजपूत या प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे काम प्रत्यक्ष पाहून भारावून गेल्या. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आले. देश पातळीवरील क्रमवारीत डॉ. नेहा यांनी ५१वे स्थान पटकाविले आहे.

डॉ. नेहा मूळच्या जळगावमधील. त्यांचे पूर्ण कुटुंबीय तेथेच आहे. त्यांनी जळगावमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई गाठले. केईएम रुग्णालयात इंटर्नशिप करत असताना त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाकाळात प्रशिक्षित डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा केली. तोपर्यंत नागरी सेवेत जाण्याचे ठरविले नव्हते. डॉक्टर होण्याचेच स्वप्न पाहिले होते.

परंतु कोरोनाकाळात प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कामाने भारावून गेले. प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सेवा बजावताना पाहिले अन् मनात ठरविले आपणही भारतीय प्रशासकीय अधिकारी व्हायचे.

त्यानंतर २०२२ला एमबीबीएस पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नातच यश आले. आता मलाही प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करता येणार असल्याचे समाधान आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com