

शिक्रापूर, ता. २६ : इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून एका तरुणाला शिक्रापुरात बोलावून घेत, त्याला अॅट्रॉसिटीची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन महिलांसह चौघांविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील वडगाव शेरी येथील सूरज चंद्रकांत वारे (वय २३) या तरुणाची शितल डाके (वय ३९, रा. करंजेनगर, शिक्रापूर) हिच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. शितलने त्याला मेसेज आणि कॉलद्वारे प्रलोभन दाखवून रविवारी (ता. २३) रात्री शिक्रापूर येथे भेटायला बोलावले. सूरज तेथे पोहोचताच शितलसह वैष्णवी गायकवाड, आकाश गायकवाड (रा. जातेगाव बुद्रुक) आणि शुभम कांडगे यांनी त्याला गाठले. त्यांनी सूरजला ५० हजार रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
रविवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५:३० वाजेपर्यंत एसटी स्थानक परिसरात हा प्रकार सुरू होता. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. सूरज वारे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन काळे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.