इन्स्टंट पीठे व प्रीमिक्स

इन्स्टंट पीठे व प्रीमिक्स
Published on

पुणे, ता. ९ : सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड प्रीमिक्स तयार करण्यास शिकवणारी कार्यशाळा १७ मे रोजी होणार आहे. यामध्ये डोसा, इडली, आईस्क्रीम, गुलाबजामुन, पोहे, उपमा, पराठा, थालीपीठ, ढोकळा, पकोडा, दाल खिचडी, पुलाव, सरबत, मिल्कशेक, केक, मल्टीग्रेन पराठा, खीर व रबडी प्रीमिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, मशिनरी इ.विषयी मार्गदर्शन होणार आहेत. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

अभ्यंग व मसाज व्यावसायिक कार्यशाळा
आयुर्वेदिक अभ्यंग व मसाज उपचारांनी संधिवात, डोकेदुखी, मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, हृदय संबंधित आजार, त्वचेचे आजार, पचनासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला लोकप्रियता लाभली आहे. तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज असणारी ही उपचार पद्धती शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, याबाबत व्यावसायिक दृष्टीतून मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय कार्यशाळा २२, २३ व २४ मे रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, औषधी तेल, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी व किती वेळ करावा अन् कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com