मोहोळ नागरी पतसंस्थेकडून मृताच्या वारसास पांच लाख रुपयांचा धनादेश प्रदान

मोहोळ नागरी पतसंस्थेकडून मृताच्या वारसास पांच लाख रुपयांचा धनादेश प्रदान

Published on

ANR26B02888
अनगर ः येथे मोहोळ नागरी पतसंस्थेच्या कर्जदार मृतांचे वारसदार जनाबाई सुतार यांच्याकडे धनादेश देताना राजन पाटील व पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी.

मोहोळ नागरी बॅंकेकडून धनादेशाचे वाटप
अनगर ः मोहोळ नागरी पतसंस्थेच्या अंजनगाव (खे) येथील शाखेतून धनाजी अजिनाथ सुतार यांनी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांचे अपघाती निधन झाले. कर्ज प्रकरण करताना त्यांनी संस्थेच्या माध्यमातून जनता अपघात विमा घेतला होता. वारसदार पत्नी जनाबाई धनाजी सुतार यांना ५ लाखांचा धनादेश सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते येथील लोकनेते साखर कारखान्याच्या प्रशासकिय भवन येथे देण्यात आला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कौशीक गायकवाड, सर्व संचालक यांनी सहकार्य केले. धनादेश प्रदानप्रसंगी लोकनेते साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष हनुमंत पोटरे, संस्थेचे व्यवस्थापक मुस्ताक शेख, शाखाधिकारी शिवाजी पवार, नागेश घाटुळे, पोपट गुंड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com