पीएमपीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांचा विमा

पीएमपीच्या ताफ्यात दीड हजार बस
पीएमपीच्या ताफ्यात दीड हजार बस
Updated on

पुणे : पीएमपीच्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक विमा योजना लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे १० लाखांचे विमा कवच कर्मचाऱ्यांना वार्षिक १७५ रुपयांत उपलब्ध होणार आहे.

ही विमा योजना ‘अ’ ते ‘ड’ गटातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. अपघातामुळे आलेला मृत्यू, कायम अपंगत्व किंवा दोन हात, पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्त्व आल्यास विमा कवच पूर्ण लागू होणार आहे. कायमचे अंशतः अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या स्वरूपात लाभाच्या टक्केवारीचाही त्यात समावेश आहे. २२ जुलैपासून ही विमा योजना कर्मचाऱ्यांना लागू झाली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात दीड हजार बस
संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी; पोलीसांचा छापा

पीएमटी कामगार संघाने (इंटक) प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून, अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे आणि कामगार जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे यांचे आभार मानले आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे म्हणाले, ‘‘सामूहिक विमा योजना लागू व्हावी, यासाठी इंटक गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होती.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com