

BWD26A00020
विमा योजनेतून वारसांना १२ लाखांचा धनादेश सुपूर्द
बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था
बेलवंडी, ता. १६ ः श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविलेल्या बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सभासद व कर्जदार दत्तात्रय लक्ष्मण विधाटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना पतसंस्थेच्या विमा संरक्षण योजनेतून १२ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. या विमा रकमेचा धनादेश मयत दत्तात्रय विधाटे यांच्या पत्नी मनीषा दत्तात्रय विधाटे व मुलगी सुषमा दत्तात्रय विधाटे यांच्याकडे पतसंस्थेच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
पतसंस्थेच्या वतीने सभासद, ठेवीदार व कर्जदारांना विमा संरक्षण देण्यात येते. सभासदाच्या कुटुंबावर अचानक संकट ओढवल्यास त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. दत्तात्रय विधाटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या १२ लाख रुपयांच्या मदतीमुळे या विमा योजनेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान, विधाटे कुटुंबीयांनी विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे आभार मानले.
याप्रसंगी चेअरमन उत्तम डाके, सोपान हिरवे, युवराज पवार, विठ्ठल लोखंडे, सचिव किसन वऱ्हाडे, अर्जुन हिवरकर, अनिल शेलार, सचिन भोसले, संपत हिरवे, राजू साळवे, राजाराम खलाटे, संदीप लबडे, आशा दरवडे, प्रविण खेडकर, विनोद जाधव उपस्थित होते.
.......................
‘बेलवंडी व्यापारी पतसंस्था सभासद, ठेवीदार व कर्जदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहे. सभासद, कर्जदार व ठेवीदारांना विमा कवच देणारी व्यापारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील एकमेव पतसंस्था आहे. एखाद्या सभासदावर दुर्दैवी प्रसंग ओढवल्यास त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेतून मोठा आर्थिक दिलासा मिळतो. सभासदांचा विश्वास हीच पतसंस्थेची खरी ताकद आहे.’
— उत्तम डाके, चेअरमन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.