आदिवासी भागातील शिक्षणाला उभारी

आदिवासी भागातील शिक्षणाला उभारी
Published on

फुलवडे, ता. २१ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत २३ शासकीय आश्रमशाळा सुरू असून, दरवर्षी आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.
दुर्गम, डोंगराळ आणि पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या. अनेकदा लांबच्या अंतरामुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शाळा सोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती होते. परंतु, आश्रमशाळेतील निवासी सोयीमुळे हे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिस्त आणि आरोग्याची सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

शैक्षणिक साहित्यासाठी थेट लाभ
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य व इतर साहित्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे रक्कम दिली जाते. यामध्ये पहिली ते चौथी ७ हजार ५०० रुपये प्रति वर्ष, पाचवी ते आठवी ८ हजार ५०० रुपये प्रति वर्ष, दहावी ते बारावी ९ हजार ५०० रुपये प्रति वर्ष, अशी रक्कम दिली जाते.

आठ आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के
विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षक व मुख्याध्यापकांचे सततचे मार्गदर्शन, राबवलेली रात्र अभ्यासिका, जादा तासिका आणि शिस्तबद्ध शैक्षणिक उपक्रमांमुळे घोडेगाव प्रकल्पातील सर्व शासकीय आश्रमशाळांचा यंदाचा दहावीचा निकाल ९५.९६ टक्के लागला असून, आठ शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

घोडेगाव प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा
गोहे, राजपूर, तेरुंगण, असाणे, आहुपे, घोडेगाव (ता. आंबेगाव), सोमतवाडी, सोनावळे, अंजनावळे, खटकाळे, खिरेश्वर, मुथाळणे, आंबे (ता. जुन्नर), टोकावडे, चिखलगाव, कोहिंडे (ता. खेड), वडेश्वर (ता. मावळ), कुरुंजी, पांगारी (ता. भोर), सातारा जिल्ह्यातील बामणोली, गोगवे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोते, बोरबेट.

मागील पाच वर्षांची पटसंख्या
सन - मुले- मुली- एकूण
२०२०-२१ - २५३३ ३०९२ ५६२५
२०२१-२२ - २४८० ३०३४ ५५१४
२०२२-२३ - २५९० ३१७४ ५७६४
२०२३-२४ - २५१३ ३१०८ ५६२१
२०२४-२५ - २५४९ ३१४८ ५७९७
२०२५-२६ - २६३० ३२७८ ५९०८

यावर्षी १ ते ६ मे दरम्यान विद्यार्थ्यांची प्रवेशवृद्धी करण्यासाठी शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी विशेष अभियान राबवून परिसरातील आदिवासी वाड्यावस्त्यांवर जाऊन पालकांशी संवाद साधला आहे. त्याचा निश्चितच येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थिसंख्या वाढीसाठी फायदा होईल.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.वि. प्रकल्प कार्यालय, घोडेगाव

05170

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com