esakal | पीएमपीचे "आयटीएमएस' बंद पडण्याच्या मार्गावर 
sakal

बोलून बातमी शोधा

Intelligent traffic management system is on the verge of shutting down

 पीएमपीने कोट्यवधी रुपये खर्च करून बसगाड्यांचे निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यान्वित केलेली "इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

पीएमपीचे "आयटीएमएस' बंद पडण्याच्या मार्गावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीने कोट्यवधी रुपये खर्च करून बसगाड्यांचे निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यान्वित केलेली "इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाचे गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे. त्यामुळे ही यंत्रणा कोट्यवधी खर्चूनही उपयोगी नसल्याचा नाराजीचा सूर सजग नागरिक मंचाच्या चर्चासत्रात रविवारी (ता. 1) उमटला. 

"स्मार्ट सिटीमधील स्मार्ट यंत्रणेच्या (आयटीएमएस) मरणासन्न अवस्थेला जबाबदार कोण' या विषयावर मंचातर्फे चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सदस्य संजय शितोळे, "आयटीएमएस' प्रणालीचे तज्ज्ञ जयंत व्ही. राव या वेळी उपस्थित होते. पीएमपी प्रशासनाने 2017 मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे बसची वेळ, ती कोणत्या मार्गावर आहे, थांब्यावर किती वाजता येणार, याची माहिती या प्रणालीद्वारे उपलब्ध होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पीएमपीच्या ताफ्यातील अनेक बसगाड्यांचे "आयटीएमएस' बंद आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाचा निष्क्रिय कारभार आणि व्यवस्थापनाचा अभाव कारणीभूत असल्याची टीका चर्चासत्रातील वक्‍त्यांनी केली. 

पीएमपीच्या गाड्यांमध्ये 54 कोटी रुपये खर्चून ही यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, या यंत्रणेतील हार्डवेअर गायब झाले असून, बसगाड्यांची माहिती देणारे डिजिटल बोर्डही बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना या यंत्रणेपासून वंचित राहावे लागत असल्याचे राव यांनी सांगितले. संजय शितोळे यांनी यंत्रणेची माहिती दिली. विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. जुगल राठी यांनी आभार मानले.

loading image
go to top