ब्रह्माकुमारी शिवानी यांच्या वेबिनारमध्ये सहभागाची संधी; आजच रजिस्टर करा!

ब्रह्माकुमारी शिवानी यांच्या वेबिनारमध्ये सहभागाची संधी; आजच रजिस्टर करा!
Updated on

पुणे : सकाळ माध्यम समूहातील "सकाळ सोशल फाउंडेशन" च्या वतीने we are in this together अंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी "सकाळ सोबत बोलूया" ही हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेल्पलाईनच्या अनुषंगाने समाजातील विविध घटकांसाठी मानसिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन व समायोजन यावर आधारित "सकाळ सोशल फाउंडेशन"कडून विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत.

दरम्यान, त्याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवार (ता. २९) ऑगस्ट रोजी, सकाळी ११.०० वाजता सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना (कोवीड १९) च्या पार्शभूमीवर येणाऱ्या मानसिक ताण-तणावाची परिस्थिती कशी हाताळावी तसेच ताण-तणावाचे व्यवस्थापन व समायोजन कसे करावे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा याविषयी अध्यात्मिक संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवानी यांचा मार्गदर्शनपर झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. हा वेबिनार सर्वांसाठी मोफत असणार आहे.

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTb42axJafTvmASrRb-opXoTItg6P49LwQKO5JTOrCkkuVuQ/viewform

We are in this together या मोहिमेच्या खालील इंस्टाग्राम व फेसबूक पेजला भेट देवू शकता.

https://instagram.com/sakal_weareinthistogether?igshid=munt7dypobxr

https://www.facebook.com/sakalweareinthistogether

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com