अंक-गणिताची रंजक पद्धतीने ओळख

सोळा हजार अंगणवाडी सेविकांना देणार ॲप; लायन्स क्लबचा उपक्रम
pune
punesakal
Updated on

पुणे : लहान मुलांना अंक-गणिताची ओळख (arithmetic) आणि गाण्यांच्या माध्यमातून उच्चारांचा सराव होण्यासाठी ‘लायन्स अंकनाद’ हे ॲप तयार करण्यात आले आहे. पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे १६ हजार अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi workers)मोबाईलमध्ये हा ॲप डाऊनलोड करून देण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्यावतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. (Interesting introduction to arithmetic)

‘लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी : २’चे पदाधिकारी व सदस्यांनी ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या वेळी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर हेमंत नाईक यांनी याबाबत माहिती दिली. लायन्स क्लबचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र गोयल, सल्लागार दिनकर शिलेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्‍याम खंडेलवाल, खजिनदार शरद पवार, सेवाकार्य समन्वयक नरेश राठी आणि ‘एलसीआयएफ’चे प्रांत अध्यक्ष विजय भंडारी या वेळी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून देण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तीन ते सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांना रंजक पद्धतीने गणित शिकविण्यात येईल.’’

pune
डोंगरांचा विध्वंस थांबवा अन्यथा आणखी मोठ्या घटना घडतील - माधव गाडगीळ

कोरोना काळातही क्लबतर्फे वेगवेगळ्या प्रकारे मदत कार्य करण्यात आले. तसेच आता राज्यातील पूरग्रस्त भागात ही मदत पोचविण्यात येत आहे. क्लबच्यावतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, उपचार, कौशल्य विकास प्रकल्पांचा समावेश आहे. क्लबने सुरू केलेल्या उपक्रमांना नागरिकांचे देखील मोठी सहकार्य लाभत आहे. त्यातून या उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढत असल्याचे क्लबकडून कळविण्यात आले.

या ॲपमध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेत एक ते दहापर्यंतचे पाढे, अंक तसेच काही निवडक कविता उपलब्ध आहेत. राज्यातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षण मिळण्यासाठी हा प्रयत्न आहे.

-हेमंत नाईक, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर, लायन्स क्लब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com