दत्तकलामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचा दिमाखदार समारोप; संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

दत्तकलामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचा दिमाखदार समारोप; संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Published on

KOR26B10646
करमाळा ः आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी अन्य मान्यवरांसह प्रा. रामदास झोळ व माया झोळ.

दत्तकलामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचा दिमाखदार समारोप

करमाळा, ता. ४ : दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी व दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचा दोन दिवसांच्या शैक्षणिक, संशोधनपर व ज्ञानवर्धक सत्रांनंतर उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित केले. सचिव माया झोळ यांनी शुभेच्छा दिल्या.

या परिषदेत मलेशिया येथील तज्ज्ञ डॉ. सॅम चान सिओकी यांनी औषधशास्त्रातील नावीन्यपूर्ण नॅनो-आधारित इलेक्ट्रोस्पिनिंग या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. एनजी क्वोक वेन यांनी एमएलएच१-कमतरतेच्या कॅन्सरसाठी सिंथेटिक लेथल थेरपीटिक्स या विषयावर सखोल विवेचन केले. तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर प्रा. डॉ. अतुलकुमार नासा यांनी फार्मसी शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर व भविष्यातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या परिषदेत देशातील विविध राज्यांतील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. गोवा, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश येथून ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर सादरीकरणात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दुसऱ्या दिवशी डॉ. विजय कोत्रा यांनी ड्रग डिस्कव्हरी तर डॉ. व्यंकटेश्वर राव यांनी इंडस्ट्री व गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस या विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित केले. परिषदेदरम्यान पोस्टर व ओरल प्रेझेंटेशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विजेत्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com