‘व्हीएसआय’तर्फे शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

प्रदर्शनात २२५ स्टॉल
या परिषदेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनामध्ये साखर उद्योगातील अभियांत्रिकी प्रक्रिया व शेतकऱ्यांशी संबंधित अवजारे, बियाणे, मशिनरी उत्पादन, कृषी निविष्ठांविषयक अवजारे उत्पादक आणि साखर कारखान्यांचे २२५ स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ‘व्हीएसआय’च्या परिसरातील शेतीमध्ये आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान विकसित केलेले ९८ प्लॉट उभारण्यात आले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत २१ देशांमधील तज्ज्ञ तसेच देश-विदेशातून दोन हजार उद्योजक, शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मांजरी (पुणे) येथील ‘व्हीएसआय’मध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशातून तसेच इंग्लंड, थायलंड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, आयर्लंड, जपान, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंडोनेशिया, इस्त्राईल, फिजी आणि मालावी या देशांतील तज्ज्ञ आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात १६५ संशोधन लेखांचे सादरीकरण होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: international conference by vsi