Ajay Bhosale
sakal
सोमेश्वरनगर - वाणेवाडी (ता. बाारमती) येथील अजय हिंदुराव भोसले या दिव्यांग जलतरणपटूने राष्ट्रीय सुवर्णपदकांच्या हॅट्ट्रिकनंतर आणखी प्रगती करत आता आंतरराष्ट्रीय पदकावरही नाव कोरले आहे. भारताच्या पथकातून खेळताना ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‘पॅरा स्वीमिंग वर्ल्ड सिरीज’ स्पर्धेत ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाइल मिश्र रिले प्रकारात रौप्य पदक पटकावले. या यशाने त्याचा आशियाई स्पर्धेच्या दिशेचा प्रवास सुकर होणार आहे.