पुण्यात २६ सप्टेंबरपासून पर्यटन लघुपट महोत्सव

पुण्यात २६ सप्टेंबरपासून पर्यटन लघुपट महोत्सव
Published on

पुणे, ता. ११ : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून परभन्ना फाउंडेशन, राज्याचा पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे पुण्यात पाचव्या ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवा’चे आयोजन केले आहे. महोत्सव २६ व २७ सप्टेंबरला बाणेर रस्ता येथील ‘यशदा’मध्ये होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे मुख्य संयोजक गणेश चप्पलवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
चप्पलवार म्हणाले, ‘‘चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार ही या महोत्सवाची संकल्पना आहे. राज्यातील पर्यटनस्थळे, संस्कृती आणि समृद्ध वारसा जगभरात पोहोचविण्यासाठी चित्रपटांचा प्रभावी माध्यम म्हणून वापर व्हावा, तसेच पर्यटन व चित्रपट क्षेत्राची अधिक घट्ट सांगड घातली जावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन केले आहे.’’
महोत्सवासाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून लघुपट, माहितीपट, व्लॉग आणि विद्यार्थी गटांतून अंतिम निवड झालेल्या ३० हून अधिक चित्रपटांचे सादरीकरण केले जाईल. याव्यतिरिक्त तज्ज्ञांच्या मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास, अशी संवादात्मक सत्रेही रंगणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, विद्यार्थी लघुपट, तसेच महाराष्ट्र व वारी पर्यटनासाठी विशेष पुरस्कार देऊन विजेत्यांना गौरविण्यात येईल. पुणेकरांनी महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com