ओतूर येथील स्पर्धांना प्रतिसाद
ओतूर, ता. ९ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विलास तांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर, रांगोळी स्पर्धा तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थिनींनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून माजी विद्यार्थी संघटना सचिव चैताली बटवाल, जयहिंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मधुरा काळभोर व जयहिंद कॉलेज ऑफ नर्सिंग आळेफाटा येथील इन्स्ट्रक्टर विकास सरबंदे आणि ऋषिकेश खर्डे-सीईओ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतन्य रूरल आय हॉस्पिटल व जयहिंद पॉलिटेक्निक फाउंडेशनच्या जयहिंद कॉलेज ऑफ नर्सिंग, आळेफाटा येथील तज्ज्ञ नर्सिंग स्टाफच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर झाले. यामध्ये ब्लडप्रेशर, शुगर, ऑक्सिजन लेव्हल, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
नर्सिंग स्टाफमधील दीप्ती कुटे यांनी आरोग्य शिक्षण, समृद्धी कासार यांनी समुपदेशन व आरोग्य, मानसी कबाडी यांनी मासिक पाळी स्वच्छता व व्यायाम, रीना कुशवाहा यांनी शस्त्रक्रियेपूर्वी काळजी, ऋतुजा शितोळे यांनी शस्त्रक्रियेनंतरची काळजी, सानिया कोरडे यांनी कुटुंब नियोजन शिक्षण तर नीलम घोडे यांनी फर्स्ट एड किटविषयी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संजय देवकर, प्रा. रामदास कदम, प्रा. उमा काळे, प्रा नीलम शिवणे, प्रा. सारिका शेटे, प्रा. शैला काशिद, प्रा. डॉ. स्नेहल वायकोस, प्रा. प्रतिभा तांबे आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

