

भिगवण, ता. २२ : येथील दुर्गामाता मंदिरामध्ये भिगवण शहर भाजपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग व प्राणायामाच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास भिगवण व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिराचे उद्घाटन योग प्रशिक्षक डॉ. पद्मजा खरड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्या हेमा माडगे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, बाळासाहेब पानसरे, दिनेश मारणे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. खरड यांनी उपस्थितांना योग व प्राणायामाचे धडे दिले. शिबिरामध्ये परिसरातील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.