International Yoga Day: शिवनेरीवर आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह; १५० जणांचा सहभाग
Shivneri Fort: आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने शिवनेरीवर योग साधना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शिवछत्रपती महाविद्यालयाचे राज्य व राष्ट्रीय खेळाडू असे सुमारे १५० जण यात सहभागी झाले होते.
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर आज ता.२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने भारताच्या प्राचीन योग परंपरा सादरीकरणाचा उत्साह पहावयास मिळाला.