
पुणे : योगसाधनेच्या अनेक फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. या अनुषंगाने उपनगरांत विविध संस्था-संघटना, सोसायट्यांमध्ये योगाभ्यासाचे धडे गिरविण्यात आले. यानिमित्ताने सहभागी साधकांनी नियमित आरोग्याचा संकल्प केला.