

Pune
esakal
बेल्हे: बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. बेल्हे येथे समर्थ शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित उपक्रमात, संकुलातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांसह ५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी भल्या सकाळी प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता.