भुजबळ विद्यालयात योग दिन उत्साहात

भुजबळ विद्यालयात 
योग दिन उत्साहात
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. २१ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही योगासनामध्ये सहभाग घेतला.
ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक किरण झुरुंगे यांनी विविध प्रकारची योगासने विद्यार्थ्यांकडून करून घेतले.

Marathi News Esakal
www.esakal.com