बकोरी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश

बकोरी ग्रामपंचायतीची 
चौकशी करण्याचे आदेश
Published on

केसनंद: बकोरी (ता. हवेली) ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक अनियमितता आणि विकासकामांच्या चौकशीचे आदेश हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सकारात्मक निर्णयामुळे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी २३ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा परिषदेसमोर पुकारलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
बकोरी ग्रामपंचायतीच्या मागील १० वर्षांतील विकासकामांमध्ये गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची तक्रार वारघडे यांनी पुराव्यांसह केली होती. वारघडे वस्ती ते बकोरी गाव रस्ता कामाची तांत्रिक तपासणी आणि माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
येत्या २१ ऑगस्ट रोजी बकोरी ग्रामपंचायत कार्यालयात ही चौकशी होणार असून, तक्रारदारांनी आपले म्हणणे व पुरावे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने न झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वारघडे यांनी दिला आहे. दहा वर्षांच्या कामांची चौकशी असल्याने त्यास वेळ लागेल, मात्र अहवालानुसार दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी शेलार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com