महिलेची गुंतवणुकीच्या आमिषाने केली इतक्या लाखांची फसवणूक

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - गुंतवणुकीवर दरवर्षी २४ टक्के लाभांश देण्याचा बहाणा करून एका महिलेची तब्बल ९५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नरेंद्र पोपट बोऱ्हाटे (वय ५८) व संतोष दत्तात्रेय सावंत (वय ४५, रा. एरंडवणा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांची २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या कोथरूड परिसरामध्ये राहायला आहेत. त्या बाणेर येथील एका नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांची नरेंद्र व संतोष यांच्यासमवेत ओळख होती. या ओळखीचा फायदा घेऊन दोघांनी महिलेस त्यांच्या एरंडवणा येथील पलाश हेल्थ केअर सिस्टीम या कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यासाठी दरवर्षी २४ टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखविले. 

फिर्यादी महिलेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यांच्या कंपनीत ७० लाख ५६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तसेच, महिलेकडून दोघांनी २५ लाख रुपये घेतले. असे एकूण ९५ लाख ५६ हजार रुपये त्यांना दिले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्याकडे २४ टक्के लाभांश मागितला. परंतु, त्यांनी लाभांश व महिलेने गुंतविलेले पैसे त्यांना न देता त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलिस ठाणे गाठून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com