गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
Published on

आळंदी, ता. २७ : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून सहा जणांची ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. भागवत गंगाधर पऱ्हाड आणि धनश्री भागवत पऱ्हाड (रा. सोपान साई रेसिडेन्सी, आळंदी) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत राहुल भोलेनाथ भोसले (रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जानेवारी २०२४ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान धानोरे फाटा येथे घडली. आरोपींनी फिर्यादी राहुल भोसले व त्यांचे बंधू गौरव यांच्याकडून १५ लाख ७४ हजार, योगेश वंजारी यांच्याकडून १.७० लाख, यशवंत गावडे यांच्याकडून १० लाख आणि शुभम व मोनिका लोखंडे यांच्याकडून ६ लाख रुपये गोळा केले. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास संपादन केला, मात्र नंतर रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
धमकावल्याने गाठले पोलिस ठाणे
धनश्री पऱ्हाड हिचे धानोरे फाटा येथे क्लिनिक असून भागवत याचे कपड्याचे दुकान आहे. ओळखीचा फायदा घेत त्यांनी एका सोनाराच्या योजनेचे नाव सांगून पैसे उकळले. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले असता, त्यांना विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोसले यांनी पोलिसांत धाव घेतली. आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com