Pune News : ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश

पुणे महापालिकेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याची संयुक्त निविदा काढून ठरावीक ठेकेदाराला फायदा होईल अशी सोय केलेली असताना त्यास आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी फटकारले.
minister madhuri misal

minister madhuri misal

sakal

Updated on

पुणे - महापालिकेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याची संयुक्त निविदा काढून ठरावीक ठेकेदाराला फायदा होईल अशी सोय केलेली असताना त्यास आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी फटकारले. या दोन्ही कचरा प्रकल्पांची प्रक्रिया, तंत्रज्ञान भिन्न आहे, संयुक्तपणे प्रकल्प चालल्यास पूर्णक्षमतेने काम होणार नाही. त्यामुळे या ओला आणि सुक्या कचऱ्याच्या स्वतंत्र निविदा काढाव्यात असे आदेश मिसाळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या निविदेसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्यांंना दणका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com