esakal | पोलीस अधीक्षकांचे अधिकार स्थानिक पातळीच्या अधिकाऱ्यांना दिले
sakal

बोलून बातमी शोधा

IPS

पोलीस अधीक्षकांचे अधिकार स्थानिक पातळीच्या अधिकाऱ्यांना दिले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : जिल्ह्यात सध्या जिल्हयात विविध भागात कोरोनाचा प्रसार रोखणे, गणपती उत्सव, विविध पक्ष संस्था संघटना यांची आंदोलन, ओबीसी, धनगर आरक्षण बैलगाडया शर्यती पुन्हा सुरु करणेकरीता शेतकरी आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचे अधिकार सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दिनांक १२ सप्टेंबर पासून २५सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री पर्यत अधिकार प्रदान केले आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हयात विविध भागात कोरोना विषाणुचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्याकरीता नागरीकांच्या संचारावर निबंध घातले आहेत. जिल्हयात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनाकडुन दुध आंदोलने, इतर आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजन केले जात आहे. धनगर समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचे आरक्षणास कायदा रद्द केल्याने व ओबीसी आरक्षण प्रयत्नासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तसेच निवेदन देण्यात येत आहेत. बैलगाडया शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. तसेच, १० ते १९ सप्टेंबर पर्यंत गणपती उत्सव साजरा होत आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पदव्युत्तर परीक्षा पुढे

याकाळात जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलीस अधीक्षक यांनी डॉ.अभिनव देशमुख यांनी ग्रामीण महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

स्थानिक पातळीवर दिलेले अधिकार

मिरवणुका त्याचे मार्ग, त्यातील वर्तणुक, वागणूक, निर्बध, कोणत्या वेळा, वेळा पाळण्याबाबत, जमाव, प्रसंगी होणारी गर्दी, अडथळा न होऊ देण्यासाठी आदेश देणे, रस्त्यावर, घाटावर, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, ढोल ताशे व इतर वादये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वादये वाजविणे विनियमन करणे व न्यावर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत, कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी, लोकांना उपद्रव होऊ नये, म्हणुन ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे असे विविध अधिकार दिले आहेत.

loading image
go to top