IPS कृष्णप्रकाश यांनी फेकला ओंडका...पोलीस-गुंडांमध्ये धुमश्चक्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारांना पकडायला गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यावेळी पोलिसांनीही प्रत्युत्तर दिल्याने धुमश्चक्री पाहायला मिळाली. अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी क्रॉसफायरिंगमध्ये दोन राऊंड फायर करत गुन्हेगारांचा माग काढला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही संबंधित मोहिमेत सहभाग घेतला होता.(IPS Krishna Prakash)

चिंचवडमध्ये योगेश जगतापची हत्या झाल्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधात होते. गुंडविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांना आरोपींबद्दल गुप्त माहिती मिळाली. पुण्याती खेड तालुक्याच्या पाईट-कोये गावात हे आरोपी असल्याचा सुगावा त्यांनी काढला. त्यांच्यासोबत तडीपार असणारा गुंड महेश माने असल्याचं कळलं. अखेर पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांची चार पथकं या ठिकाणी दाखल झाली होती. या पथकाचं नेतृत्व स्वत: आयुक्त करत होते.

गुन्हेगारांना पळताना पाहून पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. यावेळी कृष्णप्रकाश यांनी एका झाडाचं मोठं लाकूड फेकून मारलं. यामुळे एकजण बेजार झाला. थोड्याच वेळात पोलिसांनी अन्य दोघांनाही बेड्या ठोकल्या. याआधीही पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. आता या प्रकरणात अन्य काहीजणांचा समावेश झालाय.

पिंपळे गुरवमध्ये सराईत गुन्हेगाराचा(Pune Crime) गोळ्या घालून खून करून पसार झालेल्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, पोलिसांनाही स्वसंरक्षणासाठी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. हा प्रकार चाकणजवळ घडला.

योगेश रवींद्र जगताप (३७, रा. पिंपळे गुरव) या सराईत गुन्हेगाराचा गेल्या शनिवारी पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौकात खून झाला. याप्रकरणी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com