
कोरोनाच्या उद्रेकातही सहलीचा "आयआरसीटीसी'चा हेका कायम!
पुणे : शहरात कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेला असताना उत्तर भारत दर्शनाची सहल रद्द करावी, अशी मागणी बहुसंख्य प्रवासी करीत असले तरी, सहल काढण्यावर आयआरसीटीसी ठाम आहे. त्यामुळे पुण्यातील किमान 500 ते 600 प्रवाशांचे पैसे पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. रेल्वेचे स्थानिक अधिकारी दिल्लीकडे बोट दाखवित आहेत तर, जिल्हा प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडण्याची वेळ या प्रवाशांवर आली आहे.
Coronavirus : महिनाभरात परदेशात कोण, कोठे गेले?
रेल्वेच्या "आयआरसीटीसी' कंपनीने उत्तर भारत दर्शनाची सहल आयोजित केली आहे. दहा दिवसांच्या या सहलीसाठी प्रत्येकी 9 हजार 400 रुपये आकारण्यात आले आहेत. 14 मार्च रोजी पहाटे तीन वाजता ही सहल निघणार आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. घराबाहेर पडू नका, असा सल्ला जिल्हा प्रशासन देत आहे. त्यामुळे ही सहल रद्द करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. हडपसरजवळील उंड्रीगावातील 14 प्रवाशांचा एक ग्रूप त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून विनवण्या करीत आहेत. परंतु, रेल्वे अधिकारी नियमांकडे बोट दाखवित आहेत.
आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या गाडीतून सुमारे 740 प्रवासी प्रवास करणार आहेत. हे सर्व प्रवासी पुणे आणि परिसरातील आहेत. त्यात सुमारे 70 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना जास्त आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सहल रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशी या प्रवाशांची मागणी आहे. अन्य प्रवासी गटांनीही सहल रद्द करण्याचा आग्रह रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे धरला आहे. परंतु, "आयरसीटीसी'चे दिल्लीतील अधिकारी या बाबत ठाम आहेत. नियोजीत तारखेपूर्वी चार दिवस अगोदर प्रवाशांनी सहल रद्द केल्यास त्यांना एक रुपयाही परत मिळत नाही, असा नियम आहे. परंतु, तत्पूर्वी अर्ज केलेला असला तरी, त्यांना पैसे परत देण्याबाबतही "आयआरसीटीसी' उदासीनता दाखवत आहे.
Web Title: Irctc Does Not Cancels Their Trip Even There Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..