आखाती युद्धाचा परिणाम ग्रामीण शेतीवर; शेती साहित्याच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
SGW26B09495
संग्रहित छायाचित्र.
सिंचन साहित्याचे दर २० टक्क्यांनी वाढले
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले; आखाती देशातील संघर्षाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १९ : आखाती देशातील संघर्षाचे पडसाद आता शेती क्षेत्रावरही उमटत आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे प्लास्टिक उद्योगावर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीवर होत आहे. परिणामी ठिबक सिंचन साहित्य, पीव्हीसी पाइप, फिटिंग्ज तसेच अन्य प्लास्टिक अवजारांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ठिबक सिंचनासाठी लागणारे बंडल, जोडणीसाठीचे फिटिंग साहित्य तसेच इतर प्लास्टिक वस्तूंच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
उन्हाळा सुरू होताच पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार सिंचनासह अन्य प्लास्टिकच्या साहित्याची मोठी मागणी वाढते. मात्र सध्या या साहित्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेती उत्पादनाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसतानाच शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः उन्हाळी भाजीपाला, ऊस तसेच फळबागांसाठी ठिबक सिंचन अत्यावश्यक असल्याने अनेक शेतकऱ्यांना वाढीव दरात साहित्य खरेदी करावे लागत आहे.
कोट
PNE26W04975
उन्हाळ्यात नेहमीच पाइप, ड्रिप व इतर साहित्याची मागणी वाढलेली असते. मात्र सध्या कंपन्यांकडूनच दर वाढवून येत असल्याने विक्रीदरही वाढवावे लागत आहेत. दरवाढीमुळे सध्या साहित्याची विक्रीही कमी झाली आहे.
- किशोर जगताप, विक्रेते (शेती साहित्य व अवजारे)
--
PNE26W04974
- विविध शेतीमालाचे बॉक्स व कॅरेट चिकटवण्यासाठी लागणाऱ्या चिकटपट्टीचे (गमटेप) दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ७२ नगांचे बॉक्स यापूर्वी २२०० रुपयांना विक्री होत होते; सध्या तोच बॉक्स २८०० रुपयांना विकावा लागत आहे.
- आशिष येलपले, अधिकृत विक्रेते, सांगोला
--
PNE26W04976
- आमच्या फळबागेसाठी नवीन पाइपलाइन व ठिबक सिंचन करायचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर आम्ही नेहमीच नवीन बागेसाठी ठिबक सिंचन करतो. मात्र सध्या दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. या दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
- अमित पाटील, शेतकरी, यलमार मंगेवाडी (ता. सांगोला)
ठळक बाबी
-ठिबक सिंचन साहित्य व फिटिंग्ज वस्तू १५ ते २० टक्क्यांनी महाग
-प्लास्टिकचे फावडे, घमेले, पाट्या आदी साहित्यात २० टक्क्यांपर्यंत वाढ
-अडीच इंची पाइप ४०० रुपयांवरून सुमारे ५५० रुपयांवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

