Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

पुण्यात आधीच हजारो अधिकृत-अनधिकृत होर्डिंग; नव्या धोरणातून आणखी ४२०० फलकांची भर, शहराचे विद्रूपीकरण व महसुलातील अपारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
पुणेकरांच्या डोक्यावर ४ हजार नव्या होर्डिंगचे भूत! ५० कोटींच्या उत्पन्नासाठी शहराचे विद्रूपीकरण करण्याचा महापालिकेचा घाट?

पुणेकरांच्या डोक्यावर ४ हजार नव्या होर्डिंगचे भूत! ५० कोटींच्या उत्पन्नासाठी शहराचे विद्रूपीकरण करण्याचा महापालिकेचा घाट?

sakal
Updated on

पुणे : पुणे शहरात आधीच ३ हजार ३५ अधिकृत होर्डिंग आहेत. त्यात आणखी तब्बल ४ हजार २०० होर्डिंगची भर पडणार आहे. त्यासाठीची निविदा ठराविक कंपनीला मिळावी यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एकीकडे शहर सुंदर करायच्या बाता केल्या जात असताना दुसरीकडे सर्वच रस्ते, चौक महापालिका होर्डिंगने व्यापून टाकण्याच्या तयारीत आहे. त्यातून अवघे ५० कोटी रुपये उत्पन्न वर्षाला मिळणार असताना या होर्डिंग धोरणाचा अट्टहास कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com