

ज्येष्ठांनो सावधान! ३० टक्के मिळकतकर सवलतीचा मेसेज 'फेक'; पुणे महापालिकेने स्पष्टच सांगितले - "अशा अफवांवर विश्वास ठेवू नका"
sakal
पुणे : ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करामध्ये ३० टक्के सवलत मिळत असल्याचा समाजामध्यमांवर फिरणारा संदेश खोटा व दिशाभूल करणारा आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.