ISC & ICSE Exam
esakal
पुणे - ‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’तर्फे (सीआयएससीई) २०२७ मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची (आयएससी) परीक्षा नऊ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीची (आयसीएसई) परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आणि परदेशातील या दोन्ही परीक्षा मिळून एकूण तीन लाख ७९ हजार ९८० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेच्या वेळेत महत्त्वाचा बदल केला असून या परीक्षेची वेळ ४५ मिनिटे अलीकडे आणली आहे.