
मी महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कार्पोरेशनमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफिसर या पदावर काम करत असताना म्हणजेच साधारण 1980 च्या दरम्यान मी प्रथम चंदुशेठ चोरडिया यांना भेटलो. यावेळी चोरडिया व त्यांचे मित्र माऊली शिवरकर, राजाभाऊ दौंडकर, अशोक देसाई, परमानंद सावंत मला भेटायला आमच्या एस. पी. कॉलेज जवळील टिळक रोडच्या ऑफिस मध्ये आले. त्या वेळी ऑफिसकडून लघूउद्योग, मद्यम उद्योग व गाडी धंदा या व्यवसायासाठी कर्ज दिले जात असत. त्या वेळी साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी खूप प्रसिद्ध झाली, आणि युगंधर लिहायला घेतली होती. त्यावेळी सावंत यांच्या पत्नी एस. पी. कॉलेज मध्ये कारकून म्हणून काम करत होत्या. त्यांच्या कडे उदरनिर्वाहासाठी दुसरं साधन नव्हतं. म्हणून आपल्या मित्राला दरमहा काहीतरी ठराविक रक्कम व्यवसायातून मिळावी या हेतूने त्यांना ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज प्रकरणासाठी चंदूशेठ मला भेटायला आले होते. त्यावेळचे आर.टी.ओ ऑफिसर सुरती यांनी चंदुशेठ यांना माझं नाव सुचवले असे त्यांनी सांगितले.
एक साहित्यिक ट्रान्सपोर्टचा धंदा कसा चालवू शकेल? असा युक्तिवाद मी त्यावेळी केला होता. यावर या सर्व कर्जाची जबाबदारी आम्ही घेणार आहोत आणि जामीनदार राहणार असल्याचे चंदूशेठ यांनी सांगितले. त्याप्रमाणे ऑफिसकडून सावंत नव्वद हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यातून सावंतांनी दोन अँबेसिटर गाड्या घेतल्या. गाड्या घेतल्या दोन महिन्यानी कर्जाचा हप्ता भरायचा असतो पण सहा महिने झाले तरी सावंत यांकडून कर्जाचा एकही हप्ता भरण्यात आला नाही.
सावंत यांचा व्यवसायासाठी म्हणून गाड्या लावल्याचा विचार होता. पण, गाडीच्या ड्रायव्हरने व्यवसायिकाकडे गाडी लावण्यापेक्षा आमच्याकडे गाड्या सोपवा आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पैसे देऊ. व्यवसायिक गाडीतून बेकायदेशीर गोष्टीची ने-आण करतील आणि गाड्या तुमच्या नावावर आहेत तर पोलीस तुम्हाला पकडतील, अशी भीती गाडीच्या ड्रायव्हरने घातली. त्यामुळे सावंत यांनी दोन्ही गाड्या ड्रायवरच्या हातात सोपवल्या. पण या दोन्ही ड्रायव्हरने त्यांची फसवणूक केली.
चंदुशेठ व त्यांचे मित्र या प्रकरणात चांगलेच अडकणार होते. सावंत आणि हे सर्व मित्र माझ्याकडे आले व यातून काहीतरी मार्ग काढा असे मला सांगितले. यावर मी दोन्ही गाड्या ड्रायव्हरकडून हस्तगत करून चंद्रकांत शिरोळे यांना गाड्या खरेदी करण्याची विनंती केली. शिरोळे यांनी सावंत यांना चाळीस हजार रुपये रोख देऊन कर्जाची सर्व जबाबदारी घेतली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातून या मित्रांची सहीसलामत सुटका झाली. त्यानंतर चंदुशेठ यांचे टिळक रस्त्याला एक ऑफिस होते. तेथे त्यांची सतत उठ बस असायची. अनेक वेळा आमची त्या ठिकाणी भेट होत होती, पुढे आम्ही चांगले मित्र झालो. अजूनही अधून मधून या उतरत्या वयातही आम्ही फोनवरून एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो, आणि अचानक त्यांच्या निधनाची बातमी समजताच मला माझ्या साहित्यप्रेमी, सर्वांचा विचार करणारा मित्र गमावल्याने खूप दुःख झाले, आणि हा किस्सा डोळ्यापुढे उभा राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.