यासीन भटकळच्या वकिलाला ‘इसिस’ची धमकी

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासीन भटकळचे तत्कालीन वकील जहीरखान पठाण यांना इसिसकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
ISIS
ISISSakal
Summary

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासीन भटकळचे तत्कालीन वकील जहीरखान पठाण यांना इसिसकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे - जर्मन बेकरी बॉम्बस्फोट (German Bakery Bombblast) प्रकरणातील आतंकवादी यासीन भटकळचे (Yasin Bhatkal) तत्कालीन वकील जहीरखान पठाण (Lawyer Jahirkhan Pathan) यांना इसिसकडून (ISIS) जिवे मारण्याची धमकी (Warning) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अ‍ॅड. पठाण यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा न्यायाधीश पुणे, पुणे बार असोसिएशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना लेखी अर्जाद्वारे तक्रार दिली आहे. तक्रार अर्जाद्वारे अ‍ॅड. पठाण यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सध्या अ‍ॅड. पठाण जर्मन बेकरी प्रकरणात काम पाहत नाहीत. अ‍ॅड. पठाण यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार, अ‍ॅड. पठाण यांचे चेन्नईतील अशील महम्मद दाऊद यांचा मुंबईतील एका व्यक्तीशी करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारातून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा खडक पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यात दाऊद नावाची व्यक्ती संशयित आरोपी आहे.

ISIS
पुणे महापालिकेच्या जागा नगरसेवकांच्या ताब्यात ?

दाऊद याच्यातर्फे अ‍ॅड. पठाण न्यायालयीन कामकाज पाहतात. अ‍ॅड. पठाण या प्रकरणाच्या तडजोडीच्या निमित्त चेन्नई येथे गेले होते. तेथे असताना सचिन टेमगिरे नावाच्या व्यक्तीने त्याच्या वतीने येथून पुढे मौलाना नावाचा माणूस तुमच्याशी बोलेल, असे सांगितले. त्यानंतर मौलाना नावाच्या व्यक्तीने ॲड. पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्यांना मेसेज करून ‘या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, निघून जा, नाहीतर तुमच्या जिवाचे बरे वाईट करेन’, अशी धमकी दिली. तसेच, मौलाना याने इसिसच्या नावाने धमकी देत इसिसचा माणूस असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे अ‍ॅड. पठाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com