

PNE26W46389 - श्री राधादामोदर
PNE26W46744 - फोटोओळ : श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त वृंदावनहून आणण्यात आलेले एक लाख ४० हजार रुपयांचे वस्त्र.
लाखभर भाविक... मध्यरात्री कृष्णजन्म... अन् ५६ भोग!
इस्कॉनमध्ये तीन दिवस भक्तीचा जागर; लक्ष तुलसी अर्चनेपासून प्रभुपादांच्या १३० व्या जन्मोत्सवापर्यंत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १ : अक्कलकोट रोडवरील इस्कॉनच्या श्री राधादामोदर मंदिरात श्रीकृष्णजन्माष्टमीचा भक्तिमय सोहळा यंदा तीन दिवस रंगणार आहे. लक्ष तुलसी अर्चनेने सुरू होणाऱ्या या उत्सवात सुदर्शन यज्ञ, विशेष श्रृंगार दर्शन, कीर्तन, यजमानांच्या हस्ते श्रीकृष्ण अभिषेक, ‘श्रीकृष्ण जन्मलीला’ प्रवचन आणि मध्यरात्री ५६ भोगांचा नैवेद्य असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी लाखभर भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून, त्यांच्यासाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------------
लक्ष तुलसी अर्चनेने उत्सवाला गुरूवारपासून प्रारंभ
गुरूवारी (ता.३) सकाळी ८ ते १० या वेळेत १५० भक्तांच्या हस्ते लक्ष तुलसी अर्चना सोहळा होईल. सायंकाळी जन्माष्टमी पूर्वसंध्येनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जवळपास दीड हजार भक्तांना डाळ, राईस, गोड पदार्थ व भाजी असा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
------------------
सुदर्शन यज्ञासह विशेष श्रृंगार दर्शन
४ सप्टेंबरला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत मंगलारती, नरसिंह आरती व जप होईल. सकाळी ७.१५ वाजता गुरुपूजन आणि ६० यजमानांच्या हस्ते सुदर्शन यज्ञ पार पडणार आहे. सकाळी ७.३० वाजता विशेष श्रृंगार दर्शन होणार आहे. या विशेष श्रृंगारासाठी पुण्याहून तीन आणि स्थानिक सात, असे दहा कलाकार सेवा करणार आहेत.
----------------
रात्री रंगणार कृष्णजन्माची अनुभूती
गुरूवारी सायंकाळी ५ वाजता कीर्तन होईल. त्यानंतर ५.३० वाजता यजमानांच्या हस्ते श्रीकृष्णांना अभिषेक सुरू होईल. हा सोहळा रात्री ९.३० वाजेपर्यंत चालणार आहे. रात्री ९.३० वाजता उत्सवमूर्ती श्रीकृष्णांचा ब्रह्मवृंदांच्या हस्ते अभिषेक होईल. रात्री १०.३० ते १२ या वेळेत ‘श्रीकृष्ण जन्मलीला’ या विषयावर श्रवणभक्त प्रभू यांच्या अमृतवाणीतून प्रवचन होणार आहे. रात्री १२ वाजता जन्मोत्सवानंतर भगवान श्रीकृष्णांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर रात्री १२.३० वाजता पाच हजार जणांसाठी महाप्रसाद वाटपाला सुरुवात होईल.
----------------------
५ सप्टेंबरला प्रभुपादांचा १३० वा जन्मोत्सव
५ सप्टेंबर रोजी श्रील प्रभुपाद यांचा १३० वा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता दीक्षा घेतलेल्या जवळपास ३० भक्तांकडून शब्दांजली वाहण्यात येईल. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांचा अभिषेक आणि ५६ भोग नैवेद्याचे अर्पण केले जाईल. यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप होईल. यावेळी तब्बल पाच हजार भक्तांना डाळ, राईस, सब्जी, जामून आणि कचोरी असा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
-----------------------
कोट PNE26W46390
उत्सवकाळात भगवान श्रीकृष्ण व श्री राधाराणींसाठी वृंदावनहून विशेष पोशाख येणार आहेत. या उत्सवासाठीचा पोशाख तयार करण्यासाठी सुमारे एक लाख ४० हजार रुपये खर्च झाला आहे. श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी तब्बल लाखभर लोक दर्शनासाठी येतील, असा अंदाज इस्कॉन मंदिर समितीला आहे. या लाखभर भाविकांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली आहे.
- कृष्णभक्तदास प्रभू, अध्यक्ष, इस्कॉन सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.