

PNE26W47690 : सोलापूर : भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्यावर पुष्पवृष्टी करताना चरणारविंद्र दास प्रभु.
PNE26W47691 : सोलापूर : श्रील प्रभुपाद यांच्या विग्रहावर मधाचा अभिषेक करताना स्वामींचे तेजस्वी रूप अधिकच प्रफुल्लित दिसत होते.
PNE26W47695 : सोलापूर : श्रील प्रभुपाद यांना अर्पण करण्यात आलेला ५६ भोगांचा नैवेद्य.
५ हजार भक्तांच्या साक्षीने रंगला श्रील प्रभुपादांचा प्रकटदिन
इस्कॉन मंदिरात तीन दिवसांत २५ हजार भक्तांनी घेतले दर्शन; महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : श्रीकृष्ण जन्माष्टमी व इस्कॉनचे संस्थापकाचार्य भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या १३०व्या प्रकटदिनानिमित्त वृजधाम इस्कॉन सोलापूर येथे तीन दिवसीय धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सवाचे आयोजन केले होते. ३, ४ व ५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या उत्सवात तीन दिवसांत सुमारे २५ हजार भक्तांनी श्रीराधादामोदर व श्रील प्रभुपाद यांचे दर्शन घेतले. शनिवारी सुमारे पाच हजार भक्तांच्या उपस्थितीत श्रील प्रभुपाद यांचा प्रकटदिन भक्तिभावात साजरा झाला. ‘हरी बोल... हरी बोल...’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
--------------------
३० दीक्षार्थींची शब्दसुमनांजली
प्रकटदिनानिमित्त सुमारे ३० दीक्षार्थींनी शब्दसुमनांजली अर्पण करून गुरूभक्ती व्यक्त केली. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांच्या विग्रहावर पंचामृत अभिषेक करण्यात आला. आकर्षक शृंगार केल्यानंतर ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. भक्तांनी दर्शन घेत गुरूंच्या चरणी नतमस्तक होत आध्यात्मिक समाधान अनुभवले. उत्सवादरम्यान आमदार देवेंद्र कोठे व नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीही श्रीराधादामोदर व श्रील प्रभुपाद यांचे दर्शन घेतले. मंदिरातर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
-------------------
कोट PNE26W47693
तीन दिवसांच्या उत्सवादरम्यान विविध सेवांमध्ये सहभागी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवाच्या सांगतेवेळी सुमारे पाच हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. डाळ, भात, भाजी, जामून व कचोरी असा प्रसाद देण्यात आला. भक्तिभाव, नामस्मरण व सेवेत रंगलेल्या उत्सवाची महाप्रसाद वाटपाने सांगता झाली.
- कृष्णभक्तदास प्रभु, अध्यक्ष, इस्कॉन मंदिर सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.