
कॅन्टोन्मेंट : कोंढव्यातील कमेला मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कोरोना महामारीबरोबर पाऊस आणि दलदलीमुळे ऐरणीवर आला आहे. (issue of health) पालिका प्रशासनाची कचरा कुंडी नाही, स्वच्छता विभागाकडून कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचरा टाकण्यासाठी कोणतीही सुविधा नाही, (Kondhwa) त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. पालिका प्रशासनाने कचरा टाकण्यासाठी किंवा कचरा उचलून नेण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अजरबी शेख व सुंदराबाई शेंडगे स्थानिक नागरिकांनी केली. (issue of health citizens in Kondhwa)
सुंदराबाई शेंडगे म्हणाल्या की, रस्ता मोठा असूनही झाडलोट केली जात नाही, चार-पाच दिवसांतून कधी तरी येतात आणि कर्मचाऱ्यांना वाटेल तसे काम करून निघून जातात. याबाबत मुकादमाकडे तक्रार केली. मात्र, मुकादमाने सांगितले की, माझे कोणी ऐकत नाही. मुकादमालाच कर्मचारी मानत नसतील, तर सामान्यांचे काय अशी विचारणाही ही नागरिकांकडून करण्यात आली.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी कचराकुंड्या किंवा कचरागाडीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. येथील रस्त्याच्या पलीकडे कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात तर अर्धा वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येतो. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकजण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी परिस्थिती आहेत.
येथे व्यावसायिक असून, शेळी-गायीचे पालन करणारा काही वर्ग आहे. दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. सत्तार शेख यांनी सांगितले की, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत असून, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या वस्तीमध्ये कचरा स्वच्छतेविषयी गांभीर्याने पाहिले पाहिजे. कचराकुंडी ठेवावी अथवा कचरा गोळा करून नेणाऱ्या घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणे करून नागरिक कचराकुंडीमध्ये टाकतील किंवा घंटागाडीमध्ये देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.