

pune waste
पुणे - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या संमिश्र कचरा प्रक्रिया निविदेमुळे पुणेकरांच्या करावर ५६७ कोटी रुपयांचा जादा बोजा पडणार आहे. त्यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निविदा काढून पुणेकरांचे पैसे वाचवा, असा ठराव काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, अरविंद शिंदे यांनी स्थायी समितीपुढे मांडला आहे. आगामी बैठकीत यावरून वाद होण्याची शक्यता आहे.