esakal | IT कंपनीतील टिम लिडरकडून तरुणीचा विनयभंग; येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Molested

IT कंपनीतील टिम लिडरकडून तरुणीचा विनयभंग; येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयटी कंपनीतील (IT Company) टिम लिडरकडून (Team Leader) त्याच्या सहकारी तरुणीशी (Girl) लगट करीत तिचा विनयभंग (Molested) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी टिम लिडरसह सहा जणांविरुद्ध येरवडा पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (IT company Pune team leader Molested woman Filed case Yerawada police)

संजय दास (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासह कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील अधिकारी शिवी कालिया, माक डिसील्वा, हिमांशु शर्मा, इम्रान खान, निताश कुटी, हर्षवेंद्र सॉईन यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी व दास हे येरवडा येथील टेक महिंद्रा कंपनीत कामाला आहेत. दास हा टिम लिडर असून तो मार्च 2020 पासून तरुणीशी लगट करणे, तिला स्पर्श करणे, तरुणीच्या कपड्यांवरुन अश्‍लिल भाषेत बोलणे असे प्रकार करीत होता. याबाबत तरुणीने कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे तरुणीने त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

हेही वाचा: तडीपार गुंडासह नऊ जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांकडून "मोक्का'ची कारवाई

तरुणीच्या तक्रारीचे कंपनीकडून परिक्षण

कंपनीचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरूद्ध कडक धोरण आहे. त्यासंबंधीच्या समितीकडून तक्रारदार तरुणीच्या आरोपांचे काटेकोरपणे परीक्षण व निराकरण केले जात आहे. तक्रारदाराने शिफारस केलेले तृतीय पक्षाच्या प्रतिनिधीचाही त्यामध्ये समावेश आहे. तसेच याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनाही सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील, असे टेक महिंद्रा कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी कळविले आहे.

"टेक महिंद्रा कंपनीतील कर्मचाऱ्यांसंबंधीचा गुन्हा हा मुंढवा पोलिसांकडून येरवडा पोलिसांकडे वर्ग झाला आहे. त्याची चौकशी करून अटकेची कारवाई केली जाईल.''

- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा