"आयटीयन्स'च्या हृदयाचे वाढले ठोके;बैठ्या कामामुळे वाढल्या आरोग्याच्या तक्रारी 

it-employee
it-employee

पुणे - सकाळी आठ वाजल्यापासून लॅपटॉपमध्ये अक्षरशः डोकं घालून बसतो. नाष्टा असो की, दुपारचं जेवण बहुतांश वेळा एखादी ऑनलाइन मीटिंग करतानाच होते. त्यातही काही जणांचे "क्‍लायंट' परदेशातील असतील तर रात्रभर जागून काम करावं लागतं. त्याचा सगळा ताण शेवटी शरीरावर येतो... प्रख्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीतील वरिष्ठ अभियंते संदेश कुलकर्णी "सकाळ'शी बोलत होते... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला घरातून काम करण्याची सवय आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांमध्ये कामाचा ताण सातत्याने वाढतोय. जेवणाची नाहीच, परंतु झोपण्याची वेळ आणि तास अनिश्‍चित झालेत. त्यातून माझ्या काही ओळखीच्या काही "आयटीयन्स'ना ऍसिडिटी, मानाचे दुखणे, पाठदुखी या बरोबरच काही जणांचा हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याची माहिती आता कानावर येऊ लागली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्यातील बहुतांश "आयटीयन्स' मार्चपासून घरातूनच काम करत आहेत. त्यासाठी लॅपटॉप, इंटरनेट अशा सुविधा त्यांना कंपनीतर्फे पुरविण्यात आल्या. परंतु, त्यातून आता आयटीयसन्सच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेंद्र नवरे यांनी नोंदविले. 

वयाच्या पस्तीशीच्या जवळपास असलेल्या बहुतांश जणांच्या हृदयाचे आरोग्य बिघडलंय. छातीत दुखत असल्याच्या, ऍसिडिटी झाल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याबाबत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल पाटील म्हणाले, ""अनलॉकमध्ये सर्व उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. परंतु, त्यात आयटीमध्ये काम करणाऱ्यांची वेगळी समस्या असल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत एकाच जागी बसून त्यांचे काम सुरू असतं. ऑफिसमध्ये काम करताना थोड-फार फिरणं होते. पाय मोकळे होतात. सहकाऱ्यांशी बोलणं होतं. मात्र, घरातून काम करताना एकाच जागी बसून आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शरीराला हालचाल नसल्याने स्नायूंची कार्यक्षमता कमी झाली. ताणतणाव, उच्च रक्तदाब वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम हृदयविकारावर होतो. त्यामुळे आयटीयन्समधील हृदयविकाराचे रुग्ण वाढल्याचे दिसते.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com