हिंजवडीतील आयटी इंजिनिअरचा स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

महापालिकेच्या थेरगाव येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आयटी अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 17) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. वैभव अंचल जैन (वय 23, रा. वाकड, मूळ-पंजाब) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे.

पिंपरी : महापालिकेच्या थेरगाव येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आयटी अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 17) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. वैभव अंचल जैन (वय 23, रा. वाकड, मूळ-पंजाब) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे.

वैभव हिंजवडीतील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कामाला होते. शनिवारी सायंकाळी कांतिलाल खिंवसरा नरसिंह पाटील तरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असतानाच ते अचानक पाण्यात बुडाले. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना त्वरित बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT engineer dies in a swimming pool in Hinjewadi at pune