कोरोनाच्या काळात बारामतीच्या डॉक्टरांनी केल एक वेगळ संशोधन

पंतप्रधान कार्यालयासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे,नोंद
Doctor
DoctorSakal

बारामती - कोरोनाच्या (Corona) काळात बारामतीच्या (Baramati) डॉक्टरांनी Doctor केलेल्या एका वेगळ्या संशोधनाची नोंद पंतप्रधान कार्यालयासह (Narendra Modi) आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे.

येथील डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहुल मस्तुद व त्यांच्या सहका-यांनी हळदीतील करक्युमीन या घटकावर अभ्यास करून कोवीड रूग्णांवर अभ्यासून लिहीलेल्या Oral Curcumin with Piperine as Adjuvant Therapy for the treatment of COVID-19 A Randamized Clinical Trial या शोधनिबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पियर रिव्ह्यूड जर्नल, फ्रंटीयर्स इ फार्म़ाकॉलॉजी या जर्नलने दखल घेत त्यास प्रसिध्दी दिली.

Doctor
जबाबदारीतून पळणार नाही!

या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशीत झाल्यामुळे या संशोधनातील निष्कर्षांना शास्त्रीय पुरावा मिळाला व अनेक रुग्णालयांनी याचा वापर सुरु केला. कोविडच्या दोन लाटांनंतर जगाला या आजाराचे गांभीर्य लक्षात आले, या आजाराचे दूरगामी परिणाम विचारात घेता करक्युमीन या नैसर्गिक घटकापासून तयार केलेले औषध इतर औषधांच्या तुलनेत फायदेशीर असल्याचे या संशोधनाद्वारे निष्कर्षास आले. रुग्णांना कोविडपासून लवकर मुक्तता मिळण्याच्या प्रक्रीयेत हे औषध गुणकारी ठरत असल्याचे पवार म्हणाल्या. कोणत्याही औषध कंपनीच्या मदतीविना स्वयंस्फूर्तीने डॉ. पवार यांनी केलेल्या या संशोधनाची दखल पंतप्रधान कार्यालयाने तर घेतलीच शिवाय जागतिक स्तरावरही घेतली गेली.

Doctor
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांची कसून झाडाझडती

अल्टमेट्रीक स्कोअर’ या आंतरराष्ट्रीय निर्देशांकानुसार सध्या हे संशोधन जागतिक पातळीवर प्रसिध्द झालेल्या सर्वोत्तम पाच टक्के संशोधनांपैकी एक आहे. भारतासह अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, फिलिपाईन्स, कॅनडा, ब्राझील, तुर्कस्थान, पोलंड, इंडोनेशिया आदी देशातील संशोधक, डॉक्टर्स व माध्यमांनीही या संशोधनाची दखल घेतली आहे. करक्युमा या विषयावरील फ्रेंच विकीपिडीयामध्येही डॉ. कीर्ती पवार यांच्या संशोधनाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com