
कात्रज - 'आयुष्यात काय करायचं नाही हे ठरवणे गरजेचे असून ते ठरले की, काय करायचं हे लक्षात येते, यामध्ये आपला फायदा असून हा यशाचा मार्ग असल्याचे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. बिबवेवाडीतील व्हिआयआयटी महाविद्यालयात सकाळ आणि व्हिआयआयटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुक्तसंवाद कार्यक्रमातील मुलाखतीत ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विश्वकर्मा विद्यापीठाचे मुकुंद कुलकर्णी सकाळचे व्यवस्थापक रुपेश मुतालिक उपस्थित होते.