(कै.) बाबुराव जाधव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश
MGV26B15459
धर्मगाव (ता. मंगळवेढा) ः येथील एनएमएमएस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसोबत संस्थापक एम. आर. टकले व शिक्षक.
जाधव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश
मंगळवेढा : धर्मगाव (ता. मंगळवेढा) येथील (स्व.) बाबूराव जाधव विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील २१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सात विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये रीध्दी समाधान आवताडे (गुण-११४), अनुष्का मारुती फडतरे (१०८), श्रावणी नामदेव काटकर (७७), श्रेयश कैलास क्षीरसागर (७६), तनिष्का दीपक भोसले (७३), समृद्धी भारत कांबळे (६७) प्रांजली समाधान माने (६२) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक डाॅ. एम.आर टकले, सचिवा सुरेखा टकले, उपाध्यक्ष ईश्वर गडदे, श्री. बंडगर यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

