

पुणे - शहरात इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेदरम्यान शहरातील मध्यभागात रविवारी दुपारी एक ते रात्री साडेसात वाजेपर्यंत वाहतूक मार्गावर बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.